top of page
Search

आई माझीच!

  • Writer: Jyoti
    Jyoti
  • Apr 11
  • 2 min read

"आई माझीच” ही भावना असणे आणि ती सतत व्यक्त करण्याची धडपड करणे हे खूप सुंदर आहे.

ree

Know School मधे पूरब आणि त्याची आई दोघेही आले. खेळतांना त्याला एक टियारा म्हणजे मुकुट दिसला. तो मुकुट त्याने आईला घातला. या र्सव घटनेत आई ही माझीच आहे हे स्वतःला माहिती असूनही, पूरब, “ही माझीच आई आहे” हे सतत स्वतःलाच पटवून देत होता. आपल्या आवडत्या व्यक्तीला स्वतःच्या हाताने, कल्पनेने सजवल्यावर होणारा आनंद आभाळापेक्षाही कितीतरी मोठ्ठा असतो, हे सगळं पूरबच्या त्या कृतीतून अपलाल्याही पटत जातं. तो मुकुट आईच्या डोक्यावर नुसता ठेऊन पुरब मोकळ झाला नाही तर त्यातले दिवे लागतात आहे का? त्यातली फुलं नीट दिसतात का? असे अनेक विचार करुन, वेगेवेगळ्या दिशेने तो आईच्या डोक्यावरच्या त्या मुकुटाकडे पाहत होता. समोरून, मागून इकडून तिकडून विविध कोनातून तो आईच्या भोवती घिरट्या घालत होता. तो आईला सजवत होता, तिच्याच मोबाईल ने तिचे फोटो काढत होता. आई कित्ती छान दिसते याचा आनंद टिपून घेत होता.


पुरबने केलेला मोबाईल चा उपयोग हा आनंदाचे ते क्षण टिपून ठेवण्यासाठी होता. यावरुन असे म्हणता येईल की आपल्याला या माध्यमांकडे जरा वेगळ्या द्रुष्टीने पाहण्याची गरज आहे. पुरबला हे सगळं करताना बघणे म्हणजे मेजवानीच होती. त्याची ती लगबग, उत्सुकता, प्रयोग आणि त्याने लावलेले अनेक शोध हे सगळं शिगेला पोचल होतं, इतकं की त्याच्या त्या ऊर्जेचा त्याच्या आईला त्रास होत असावा, पण तरीही पूरबच्या चाललेल्या या खेळाचा आईला खूप आनंद होता.


ree

गर्भात असतानापासून ते जन्म झाल्यावर जवळ जवळ आठ वर्षांपर्यंत आपल्याला, आपण स्वतः आणि आपली आई, ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, याची जाणीव नसते. किंबहुना वयाच्या आठ वर्षांपर्यंत वेगळेपणाची ही जाणीव हळूहळू होत जाते. जन्मापासून ते आठ वर्षांच्या या काळात मूलांची स्वतःच्या आईला समजून घेण्याची धडपड सुरु असते. आई म्हणजे काय? कोण? कशी? अशी का? तशी का? या आणि शब्दांत न मांडता येणाऱ्या अशा अनेक प्रश्नाची उत्तरं मुल या वयात शोधत असतं. आपल्या प्रत्येक खेळातून, कृतीतून, त्यांचे हे शिक्षण निरंतर सुरु असते. आपण असे केले तर आई हा प्राणी कशी प्रतिक्रिया देतो याची अगदी बारीक नोंद मुलांचा मेंदू आणि मन टिपत असतो. आपल्या कृतीवरील आईची प्रतिक्रिया आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या भावना ही फार मोलाची माहिती गोळा करत ते आईला समजून घेणे शिकतात. आता इथं एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. वयाच्या या टप्प्यात आईला समजून घेण्याच्या ह्या प्रकियेत मुले स्वतःबद्दल शिकत असतात. परंतु दुर्दैवाने अगदी अडीच वर्षांपासून हल्ली मुलांना शाळेत घातले जाते आणि आईचा सहवास कमी झाल्याने मुले स्वतःला समजून घेऊ शकत नाही. या वयात आईच्या सहवासात त्यांना शक्य तितकी मोकळीक आणि स्वातंत्र्य मिळत असते आणि तो त्यांच्या गर्भसिद्ध अधिकार आहे. Know School मध्ये मुलांसोबत पालकांनी देखील यावं याचा आग्रह याचकरिता आहे.

 
 
 

Comments


bottom of page